S M L

कोर्टाची सलमानला 'किक', 5 वर्षांची शिक्षा

Sachin Salve | Updated On: May 6, 2015 06:18 PM IST

 कोर्टाची सलमानला 'किक', 5 वर्षांची शिक्षा

06 मे : अखेर सल्लुमियाँ आता जेलमध्ये जाणार...2002 साली बेदकारपणे गाडी चालवून एकाचा बळी घेणार्‍या सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सलमानविरोधात सर्व आरोप सिद्ध झाले असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही सिद्ध झालाय. सलमानला 5 वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठवण्यात आलाय. सलमान मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार आहे. जर आज जामीन मिळाला नाहीतर सलमानची ऑर्थर रोडमध्ये रवानगी होणार आहे.

28 सप्टेंरबर 2002 साली सलमान खानने दारु पिऊन वांद्र्यामध्ये आपल्या लँड क्रुझर गाडीने फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडले होते. या अपघातात 1 जणांचा मृत्यू तर 4 चौघे जण जखमी झाले होते. गेल्या 13 वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती. अखेर आज न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. सलमान दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं कोर्टात सिद्ध झालं आणि त्यानेच पाच जणांना उडवलं असल्याचं स्पष्ट झालं. कोर्टाने सलमानला दोषी ठरवलं. पण, शिक्षा कमी व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद केला. शिक्षा कमी करा,जास्तीचा दंड भरण्यास तयार आहोत अशी याचना सलमानने केली. कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानला कोर्टात अश्रू अनावर झाले. कोर्टातच सलमान रडला. त्याची बहिण अर्पितालाही कोर्टात रडू कोसळलं. मात्र, सरकारी वकिलांनी आपली बाजून लावून धरली. सलमानला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी केलीय. दरम्यान, कोर्टाने निर्णय राखून ठेवला आणि दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा एकदा सुनावणी सुरू केली. कोर्टाने सलमानला या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावलाय. कोर्टाचा निकालनंतर सलमानची प्रकृती खालावली. सलमानच्या छातीत दूखू लागल्यामुळे त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे त्यानंतर त्याची ऑर्थर रोडमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.

दरम्यान, निकालाची प्रत मिळाल्यावर सलमानला हायकोर्टात अपील करता येणार आहे. पाच वर्षांची शिक्षा झाल्यामुळे सलमानला थेट कोठडीत नेलं जाणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मी आनंदी आहे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या आभा सिंग यांनी दिली. तर निकालाची प्रत अद्याप हाती आली नाही. पण सर्व आरोपांअंतर्गत सलमान दोषी आहे. त्याने गुन्हा केल्याचं न्यायालयानं मान्य केलंय. सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याची जबानी संपूर्णपणे खोटी असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं अशी प्रतिक्रिया सरकारी वकिल प्रदीप घरत

यांनी दिली.

 #‎फैसलासलमानचा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2015 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close