S M L

बॉलिवूड हळहळलं, पाहा कोण काय म्हणालं?

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2015 09:45 PM IST

बॉलिवूड हळहळलं, पाहा कोण काय म्हणालं?

vlcsnap-2015-05-06-15h31m28s6706 मे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला फुटपाथ अपघातप्रकरणात दोषी ठरवून 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे समजल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड सलमानच्या पाठीशी उभे राहिले आहे.

अभिनेते रितेश देशमुख याने, निकालावर व्यक्त होणार नाही, पण सलमानसाठी वाईट वाटतं असल्याचं ट्विट केलं असून मोठं मन असलेला सर्वात चांगला माणूस सलमान खान, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली आहे. तर, जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती चुकीचा असला तरीही त्याला शिक्षा झाल्याचे दु:ख आपल्याला होते. आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि सदैव तुझ्या पाठीशी आहोते, असं ट्विट अभिनेत्री आलिया भटने केले आहे.

 शोभा डे

आता खरी वेळ आहे माणुसकी दाखवण्याची

रितेश देशमुख

निकालावर व्यक्त होणार नाही, पण सलमानसाठी वाईट वाटलं, मोठं मन असलेला सर्वात चांगला माणूस सलमान खान

परेश रावल

सलमान खानला शुभेच्छा...खानमध्ये सर्वोत्तम आहे सलमान

फराह खान

मी दुबईत आहे, सलमान आणि कुटुंबियांसाठी प्रार्थना करते

सोनाक्षी सिन्हा

वाईट बातमी. काय बोलावं कळत नाही पण सलमानची साथ नेहमीच देईन.अत्यंत चांगला माणूस

सुभाष घई

सलमानसोबत सर्वांनी कोर्टाच्या निकालाचा आदर करावा.सलमान एक उत्तम व्यक्ती पण नशीबाशी लढू शकत नाही.

आलिया भट

आपल्या जवळच्या व्यक्तीला शिक्षा होते तेव्हा वाईट वाटतं, त्यांची चूक असली तरीही. आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला साथ देऊ.

ऋषि कपूर

संपूर्ण कपूर परिवार खान कुटुंबियांच्यासोबत आहोत. या कठीण काळात सलमानला सामर्थ्य मिळो

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2015 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close