S M L

सलमानला जामीन मिळाला, २ दिवसांचा जेलचा मुक्काम टळला

Sachin Salve | Updated On: May 6, 2015 10:12 PM IST

सलमानला जामीन मिळाला, २ दिवसांचा जेलचा मुक्काम टळला

06 मे : फुटपाथ प्रकरणी सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने 5 वर्षांची सुनावली. मात्र, मुंबई हायकोर्टाने सलमानला तुर्तास दिलासा दिलाय. सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे सलमानचा आजचा तुरूंगवास टळलाय. निकालाची प्रत मिळाली नसल्यामुळे सलमान खानला जामीन मंजूर झालाय.

28 सप्टेंरबर 2002 साली सलमान खानने दारु पिऊन वांद्र्यामध्ये आपल्या लँड क्रुझर गाडीने फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं होतं. या अपघातात 1 जणांचा मृत्यू तर 4 चौघे जण जखमी झाले होते. गेल्या 13 वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती. अखेर आज (बुधवारी)मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. सलमान दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं कोर्टात सिद्ध झालं आणि त्यानेच पाच जणांना उडवलं असल्याचं सिद्ध झालं. कोर्टाने सलमानला दोषी ठरवलं आणि पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला. शिक्षा सुनावल्यामुळे सलमानला कोर्टातच रडू कोसळलं. सलमानच्या वकिलांनी कमी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केला. पण सरकारी वकिलांनी साक्षीदार आणि पुराव्याची भक्कम बाजू उभी केल्यामुळे सलमानावर आरोप सिद्ध झाले. पण, तुरुंगवारी टाळण्यासाठी सलमानने आटोकात प्रयत्न केला. सलमानचे वकील हरीष साळवे यांनी हायकोर्टात जामिनासाठी अपील केलं. पूर्ण ऑर्डर मिळाली नसल्यानं आम्हाला आणखी एक दिवस द्यावा असा युक्तीवाद हरीष साळवे यांनी केला.पण, निकालाची प्रत मिळाली नाही आणि सेशन्स कोर्टाने सलमान खानला कोर्टासमोर शरण व्हायला सांगितलं होतं. पण त्याची कुठलीही मुदत कोर्टाने आपल्या निकालात नमूद केली नव्हती. या दोन कारणांमुळे सलमानला जामीन मंजूर करण्यात आला.

===================================================================================

संबंधित बातम्या

===================================================================================

सारे करून भागले पण जेलचे दार उघडलेच !

#फैसलासलमानचा, दिवसभरात काय घडलं?

अभिजीत यांचा बिघडला सूर, ‘कुत्ता रोड पर सोएगा तो मरेंगा’

बॉलिवूड हळहळलं, पाहा कोण काय म्हणालं?

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2015 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close