S M L

नारायण राणे जिंकले, सिंधुदुर्ग बँकेत वर्चस्व कायम

Sachin Salve | Updated On: May 7, 2015 06:14 PM IST

30_TH_NARAYAN_RANE__278429e07 मे : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पॅनलने 15 जागा जिंकत आपल वर्चस्व कायम ठेवलंय. तर शिवसेना भाजप प्रणीत सहकार वैभव पॅनलचा चांगलाच धुवा उडाला असून त्यांना चारच जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीत राणेंना पराभूत करण्यासाठी राजन तेली यांनी कंबर कसली होती, पण राणेंनी बाजी मारली. त्यातच नारायण राणेंचा विधानसभा निवडणुकीत दोनदा झालेल्या पराभवानंतर जिल्हा बँकेवर पुनःवर्चस्व मिळाल्याने निदान जिल्हा बँकेवर तरी वर्चस्व सिद्ध करण्यात राणेंना यश आलंय.

दरम्यान, या निवडणुकीत सहकार वैभव पॅनलचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांना मात्र पराभव पत्कारावा लागला. या निकालानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापल्याच पहायला मिळालंय. कारण माजी आमदार राजन तेलींच्या कणकवली येथील घरावर अज्ञातानी दगडफेक केल्याची घटना घडली. राजन तेली यांनी हे कृत्य राणे समर्थकांकडूनच घडल्याचा आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचा सांगितलंय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2015 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close