S M L

दोषी सलमानच्या भेटीला नितेश राणेही !

Sachin Salve | Updated On: May 7, 2015 07:00 PM IST

दोषी सलमानच्या भेटीला नितेश राणेही !

nitesh meet raj07 मे : फुटपाथ अपघात प्रकरणात दोषी अभिनेता सलमान खानबद्दल बॉलिवूडकरांना चांगलाच पुळका आलाय. वांद्र्यातील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवास्थानी सेलिब्रिटींनी रात्रीपासून गर्दी केलीये. त्यातच आज सकाळपासून राजकीय नेत्यांनीही गर्दी केलीये.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही सलमानची भेट घेतलीये. नितेश राणेंनी सलमानच्या घरी जाऊन भेट घेतलीये.

नितेश राणे आणि सलमानचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळेच नितेश राणे यांनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीवर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आरोपींना राजाश्रय मिळेल, असं वातावरण तयार करु नये असा टोला शेलार यांनी लगावलाय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2015 07:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close