S M L

सलमानची शिक्षा मला द्या!, चाहत्याच्या कोर्टाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

Samruddha Bhambure | Updated On: May 8, 2015 02:05 PM IST

सलमानची शिक्षा मला द्या!, चाहत्याच्या कोर्टाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

08 मे : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टाबाहेर सलमानच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सलमानला अटक झालेली मी बघू शकत नाही, असं म्हणत सलमानच्या चाहत्याने हायकोर्टाच्या आवारातच विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे, पोलिसांनी त्याला लगेचं उपचारासाठी चाहत्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान, त्याची प्रकृती ठीक असल्याचं ही समजते.

सलमानसाठी आपल्या जीवाचीही परवा न करणार्‍या या चाहत्याचं नाव गौरांग कूंडू असं आहे. गौरांग हा एक स्ट्रगलिंग लेखक आहे. काही महिन्यांपूर्वी सलमाननं त्याला मदत केली होती. त्यामुळं सलमानचे आपल्यावर उपकार आहेत. त्याला होणारी शिक्षा मला द्या पण सलमानला शिक्षा करु नका, त्याला अटक होताना मी बघू शकत नाही, असं त्याने पत्र लिहिलं होतं.

लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या सलमान खानच्या भोवती नेहमीच चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याआधी सेशन्स कोर्टात त्याच्या शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सलमानच्या राहत्या घराबाहेर देखील चाहत्यांची झुंबड उडाली होती. तसंच कोर्टाबाहेर देखील अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान, चाहत्यांसोबतच सलमानच्या विरोधात, इतर दोषींप्रमाणेच कारवाई व्हावी अशा मागणीची निदर्शने करणार्‍यांचीही गर्दी झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close