S M L

नाशिकमध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रास्ता रोको

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 03:16 PM IST

नाशिकमध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रास्ता रोको

08 मे : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी गावातील दूध व्यावसायिक शेतकर्‍यांनी आज (शुक्रवारी) दूध दरवाढीसाठी नाशिक-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको केला. 2 तास त्यांनी रस्ता रोखून धरल्यानं वाहतूक ठप्प झाली होती.

सहा महिन्यांपासून दुधाचे भाव कमी कमी होतायत, 27 प्रति लिटर रूपयेवरून भाव आता 16 रु प्रति रुपये लिटरवर आलाय. वर्षभर पांगरी गावात पाण्याचा दुष्काळ असून या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. एकट्या पांगरी गावातून 20 हजार लिटर दूध उत्पादन होतं. दूध व्यावसायिक शेतकर्‍यांकडून 16 रुपयेने दूध घेऊन, बाजारात हेच दूध प्रति लिटर 40 रूपयाने विकालं जातं. दलालांची नफ्याची दरी कमी करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसंच दूध पावडरची निर्यात सुरू करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close