S M L

सलमान सुटला, पण कोर्टात काय घडलं ?

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 04:44 PM IST

सलमान सुटला, पण कोर्टात काय घडलं ?

08 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली असून 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर केलाय. मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे आज सलमानला जेल होणार की बेल याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं नेमकं कोर्टात काय घडलं...

 सलमानच्या जामिनावर वाद-प्रतिवाद

सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद

- अपघाताच्या वेळी कारमध्ये चार जण होते

- अपघातचं ठिकाण आणि हॉटेल मॅरियट हे 7 ते 8 किमीच्या अंतरावर आहे

- तिथे पाहोचायला त्यांना अर्धा तास लागला असेल तर मग गाडीचा वेग 90 प्रति किमी कसा ?, तो 40 असायला हवा..!!

- साक्षीदार रवींद्र पाटील यांची 2002 मध्ये एका वृत्तपत्रात आलेली मुलाखत ग्राह्य का धरली जात नाही

- त्या मुलाखतीत पाटील याने गाडी अल्ताफ चालवत होता असं म्हटलं होतं.

सरकारी वकिलांचं उत्तर

- कमाल खानच्या साक्षीचा मुद्दा सेशन्स कोर्टात नव्हता

- हा मुद्दा हायकोर्टात मुद्दाम आणला गेलाय

- सरकारी वकिलांचा सलमानच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध

- रविंद्र पाटील यांनीही गाडीत तीनच लोक असल्याचं सांगितलं होतं

- कमाल खानचा जबाब आधी नोंदवला होता

- पण नंतर त्यांनी ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारल्यानं ते जबाब नोंदवण्यासाठी उपलब्ध झालेले नाहीत

कोर्टाने सलमानच्या वकिलांना सुनावले

- कोर्टाची दिशाभूल करू नका

- निकालाची प्रत मिळाली की नाही ते आधी सांगा

- अंतरिम जामीनासाठी जे कारण दिलं होतं त्याचं काय झालं

- न्यायाधीशांनी सलमानच्या वकिलांना केला प्रश्न

न्यायाधीशांचं मत

- सलमानच्या खटल्यावर स्थगिती मिळायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे -न्यायाधीश

- याचिका प्रलंबित असताना याचिकाकर्त्यानं का सहन करावं -न्यायाधीश

- याचिकाकर्त्याचा हक्क अबाधित राहावा -न्यायाधीश

सलमानला सशर्त अटी

- 30 हजार रुपयाचा बाँड भरावा लागेल

- पासपोर्ट कोर्टाकडे जमा करावा लागेल

- देशाबाहेर प्रवासासाठी परवानगी घ्यावी लागेल

-सलमानने यापुर्वीच बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्ट जमा केलेला आहे

- हायकोर्ट 15 जूनला या प्रकरणात पुढचे दिशानिर्देश देईल

- जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या प्रकरणी सुनावणी सुरू होईल

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close