S M L

काळबादेवीत भीषण अग्नितांडव, अग्निशमन दलाचा 1 जवान बेपत्ता

Sachin Salve | Updated On: May 9, 2015 10:57 PM IST

काळबादेवीत भीषण अग्नितांडव, अग्निशमन दलाचा 1 जवान बेपत्ता

09 मे :: मुंबईतील काळबादेवी परिसरात इमारतीला भीषण आग लागलीये. काळबादेवीमध्ये जुन्या हनुमान गल्लीत गोकूळ निवासातल्या 33 नंबरच्या इमारतीला ही आग लागलीये. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचा एक जवान बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. तर तीन जवान जखमी झाले आहे. आगीने रौद्ररुप धारण केलं असून चार मजली इमारत कोसळलीये. कोसळलेल्या इमारतीच्या खाली अग्निशमन दलाचे 3 ते 4 अधिकारी अडकण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही आग सुरूच आहे.

या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही आग लागली. लाकडाची इमारत असल्यामुळे आग आटोक्यात आणणं कठीण झालंय. चिंचोळी गल्ली असल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना पोहचण्यास अडचणी येत आहे. आग लागल्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग आणखी पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या हजर आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोक्यात प्रयत्न करत आहे. मात्र, आगीची भीषणात अधिक असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2015 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close