S M L

आईविना चिमुकलीचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 10, 2015 09:08 PM IST

आईविना चिमुकलीचा मृत्यू

10  मे : मुंबईतील कुर्ला इथल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोडच्या पुलाखाली झोपडीत राहणार्‌या चार महिन्याच्या मुलीनं आईविना प्राण सोडल्याची सुन्न करणारी घटना रविवारी घडली. जगभरात आज मातृदिन साजरा केला केला असतानाच याच दिवशी एका चिमुकलीला आईविना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बीकेसी पोलिसांनी एप्रिलमध्ये कचरा वेचणा-या तिघा महिलांना चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. यातील एक महिला गरोदर असल्याने पोलिसांनी तिला सोडून दिले व उर्वरित दोघा महिलांना अटक केली. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने या दोघा महिलांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र पैशाअभावी या दोघा महिलांची सुटका होऊ शकली नाही व त्यांना तुरुंगातच दिवस काढावे लागत आहेत. ज्या गरोदर महिलेला पोलिसांनी सोडले होते तिने अटकेत असलेल्या महिलेच्या चौघा मुलांसह पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यातील दोघा मुलांना घरी पाठवून दिले. तर चार महिन्याच्या कुसूमला आईकडे न ठेवता घरी पाठवून दिले. शेजारचे या मुलीचा सांभाळ करत होते. रविवारी या चिमुकलीचा दुदझ्वी अंत झाला. तुरुंगात असल्याने तिच्या आईला मुलीला शेवटचं बघताही आले नाही व अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही.

दरम्यान, या सर्व प्रकरणात पोलिसांचा हलगजच्पणाही समोर येत आहे. नियमाप्रमाणे तान्ह बाळ त्याच्या आईसोबत राहू शकतं. पण बीकेसी पोलिसांनी चिमुकल्या कुसूमला आईसोबत राहू दिले नाही. जामीन मिळूनही महिनाभरापासून या महिला पैशाअभावी तुरुंगातच आहेत. पोलिसांनी याकडेही दुर्लक्ष केले. आता चिमुकलीचा मृत्यू झाल्यावर पोलिसांनी संबंधीत महिलेला सोडून दिल्याचे समजते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2015 09:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close