S M L

ठाण्यात हजारो झाडांची बेकायदा कत्तल

Sachin Salve | Updated On: May 11, 2015 10:05 PM IST

ठाण्यात हजारो झाडांची बेकायदा कत्तल

thane tree cut11 मे : ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी आणि राजकीय पक्ष किती बिल्डर धार्जिणं आहेत हे पुन्हा एकदा समोरं आलंय.   कोलशेत भागातल्या, क्लेरीयंट कंपनीच्या जागेवर, टॉवर बांधण्यासाठी वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. असं असताना या जागेवर असलेल्या हजारो झाडांची कत्तल सुरू झालीये. खोटी आकडेवारी दाखवून वृक्षतोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठाणे महानगर पालिकेतले अधिकारी, आणि राजकीय पक्षांना हाताशी धरुन ही बेकायदा वृक्षतोड करण्यात येत असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी केलंय. दरम्यान, वृक्ष तोड प्रकरणी, पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी धाड टाकली. खारफुटी गाडून टाकणार्‍यांवर कारवाई केलीये. तसंच 40 ट्रकही जप्त केले आहे. पर्यावरण रक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे आदेशही कापूरबावडी पोलिसांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकाराला पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय. आता या संपूर्ण प्रकाराची तक्रार पर्यावरण मंत्र्यांकडे करणार असल्याचे ठाणे महापालिकेत सत्ता असलेले सेना आमदार सांगत आहेत. हा प्रकार समोर आल्यावर प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून जबाबदार अधिकारी सुट्टीवर गेलेत आणि पालिका प्रशासन प्रतिक्रिया तर सोडा पण माहिती अधिकारातही उत्तर देत नाहीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2015 10:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close