S M L

प्रसिद्ध नाटककार आणि लेखक अशोक पाटोळे यांचे दीर्घ आजाराने निधन

Samruddha Bhambure | Updated On: May 12, 2015 10:17 AM IST

प्रसिद्ध नाटककार आणि लेखक अशोक पाटोळे यांचे दीर्घ आजाराने निधन

12 मे : 'आई रिटायर होतेय',  'जाऊ बाई जोरात', 'श्यामची मम्मी', यांसारखी अनेक लोकप्रिय नाटके लिहिणारे प्रसिद्ध नाटकककार, लेखक अशोक पाटोळे यांचे आज (मंगळवारी) मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

कथाकार, नाटककार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध असलेले अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. 1971 साली लिहिलेली आयजीच्या जिवावर बायजी उदार ही त्यांची पहिली एकांकिका होती. याशिवाय, अधांतर, अध्यात न मध्यात, हद्दपार, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचंही लेखन त्यांनी केलं. झोपा आता गुपचूप, प्रा.वाल्मिकी रामायण, हीच तर प्रेमाची गंमत आहे, यांसारखी विनोदी नाटकं, तसंच 'मी माझ्या मुलांचा', 'आई रिटायर होतेय' यांसारख्या हृदयस्पर्शी नाटकांचं लेखन त्यांनी केलं आहे. पाटोळे यांनी एक चावट संध्याकाळसारख्या वेगळ्या नाट्यप्रयोगाचंही लेखन केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2015 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close