S M L

परप्रातियांना फुकटात घरं मिळतात मग जवानांना का नाही ?- राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: May 12, 2015 04:18 PM IST

raj_nashik43512 मे : मुंबईत परप्रातीयांचे लोंढे येतात. त्यांना हक्काची घरं मिळतात पण, जीवाची बाजी लावणार्‍या जवानांना घरं का मिळत नाही असा सवाल उपस्थित करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या घराची व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी संजय राणे आणि महेंद्र देसाई यांच्या कुंटुबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पालिकेला खडेबोल सुनावले. अग्निशमनदलाचे जे शहीद जवान आहेत. त्यांच्या घराची व्यवस्था सरकारने केली पाहिजे त्यांना वार्‍यावर सोडता येणार नाही. आज मदत म्हणून नोकरी दिली जाते. पण, उद्या जर इथून जावं लागलं तर काय करणार ?, महाराष्ट्रातून परप्रांतियांचे लोढें येतात. अनधिकृत झोपड्यात राहतात आणि त्यांना फुकटात हक्काची घरं मिळतात. मग, आपल्या या जवानांना आणि पोलिसांना घरं का मिळत नाही. नुसत्या नोकर्‍या देऊन काही होणार नाही असंही राज म्हणाले. तसंच अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांच्या विम्याच्या प्रश्नाकडेही सरकारने लक्ष द्यायला पाहिजे या संदर्भात पालिका आयुक्त यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना वेळ असेल तर त्यांचीही भेट घेणार आहोत असंही राज यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2015 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close