S M L

साखरेचा भाव 35 रुपयांवरून गेला 42 रुपयांवर

29 ऑक्टोबर साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूच्या दरात वाढ झाली आहे. अवघ्या 8 दिवसांत साखरेची किंमत 35 रुपयांवरून 42 रुपयांवर पोचली. वाशीच्या घाऊक बाजारात साखरेचा पुरेसा साठा नसल्यामुळे साखरेचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत साखरेचा भाव 50 रुपयांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अवघ्या वर्षभरात साखरेच्या घाऊक आणि किरकोळ बाजारातल्या साठ्यात मोठी घट झाली. याचा परिणाम साखरेच्या दरांवर झाला. साखरेचे दर केवळ वर्षभरात किलोमागे 28 रुपयांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे भाव वाढल्याने, येत्या 2-3 महिन्यांत साखरेचे भाव किलोमागे 50 रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसंच, साखरेचं नवीन पीक डिसेंबरमध्ये हाती येणार असल्याने, या वाढत्या दराचा भुर्दंड आणखी 2-3 महिने ग्राहकांना सोसावा लागणार आहे. नुकत्याच सत्तेवर आलेल्या सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या दिवसांत आटोक्यात आलेल्या साखरेच्या किंमतींनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण साखरेच्या दरात पुन्हा वाढ होण्याच्या शक्यतेमुळे सर्वसामान्यांसाठी साखरेची चव काहीशी कडवट होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2009 10:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2009 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close