S M L

भारताचा ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय

29 ऑक्टोबर नागपूर वन-डेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 रन्सनी पराभव केला. भारतानं विजयासाठी ठेवलेलं 354 रन्सच्या बलाढ्य टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची इनिंग 255 रन्सवर आटोपली. शेन वॉटसन आणि टीम पेननं ऑस्ट्रेलियाच्या इनिंगची सुरुवात केली. पण मॅचच्या पाचव्याच ओव्हरमध्ये टीम पेनला आऊट करत प्रवीण कुमारनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर शेन वॉटसन, कॅप्टन रिकी पॉण्टिंग आणि कॅमेरुन व्हाईटही झटपट आऊट झाले. 54 रन्स करणार्‍या मायकेल हसीनं एकाकी लढत देत ऑस्ट्रेलियाचा पराभव लांबवला. पण रविंद्र जाडेजानं त्याची विकेट घेत विजयातला अडसर दूर केला. भारतातर्फे जाडेजाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर प्रवीण कुमारनं 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 7 विकेट गमावत 354 रन्स केले. कॅप्टन महेंद्र सिंग धोणीनं 107 बॉलमध्ये 124 रन्सची शानदार खेळी केली. याशिवाय गौतम गंभीरनं 74, सुरेश रैनानं 62 तर सेहवागनं 40 रन्स करत भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. या विजयाबरोबरच भारताने सात वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबर केली आहे. आता तिसरी वन-डे येत्या 31 तारखेला दिल्लीमध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2009 11:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2009 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close