S M L

काबूलमधल्या दहशतवादी हल्ल्यात 4 भारतीयांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 14, 2015 11:35 AM IST

काबूलमधल्या दहशतवादी हल्ल्यात 4 भारतीयांचा मृत्यू

14 मे : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका गेस्टहाऊसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 4 भारतीयांसह 9 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी 3- 4 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काबूलमधल्या कोलोला पुश्त इथल्या पार्क पॅलेस हॉटेलमध्ये काल (बुधवारी) रात्री संगीताचा कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 4 बंदुकधारी दहशतवाद्यांनी हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झालेत. पोलीस आणि विशेष सुरक्षा यंत्रणांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या 44 जणांची सुटका केली आहे.

दरम्यान, या हॉटेलमध्ये तीन भारतीय होते. ते तिघेही सध्या भारतीय दुतावासात सुरक्षित असल्याचे अफगाणिस्तानमधील भारताच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2015 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close