S M L

एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार - विनोद तावडे

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2015 01:00 PM IST

एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार - विनोद तावडे

15  मे : राज्य सरकार एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा विचार करत असल्याचा धक्कादायक खुलासा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी शाळा मुद्दाम सुरू ठेवल्या जातात. पण अशा शाळांमुळे राज्य सरकारचं मात्र नुकसान होतं. त्यामुळे अशा शाळा कायमच्या बंद करण्याचा विचार केला जात असल्याचा खुलास तावडेंनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.

राज्यातली अशा कित्येक शाळा आहेत जिथे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक देणं परवडत नाही. अशा वेळी दोन इयत्तांना मिळून एकच शिक्षक दिला जातो. जो एकाच वर्गात दोन्ही इयत्तेच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवतो. अशा व्यवस्थेला 'एक शिक्षकी शाळा' म्हणतात. राज्य सराकारच्या आकडेवारी नुसार राज्यातील एकुण शाळांमध्ये 4 टक्के शाळा म्हणजेच तब्बल 3500 शाळा या एक शिक्षकी शाळा आहेत.

विशेष म्हणजे या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या जास्त आहे. तज्ञांच्या मते एक शिक्षकी शाळा चालवणं हे मुळातच अयोग्य आहे. पण असं असल तरी या शाळा अचानक बंद करणं हा त्यावरचा उपाय नाही. या निर्णयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचं सर्वात जास्त नुकसान होण्याची भीतीही तज्ञांनी व्यक्त केली आहे. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शिक्षक संघटनांनीही राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात कडक पावलं उचलण्याचा उशारा दिला आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2015 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close