S M L

पंकजा मुंडेंना म्हणायचं काय ?, पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी

Sachin Salve | Updated On: May 15, 2015 11:16 PM IST

Pankaja munde palve15 मे : कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हं आहेत. पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे त्यांची तारांबळ उडत असेल, पण ते सक्षम आहेत, अशी टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केलीये.

तसंच मुख्यमंत्र्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांच्यावर टिप्पणी करणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे असं आहे. आपण राज्याच्या कारभारावर समाधानी आहोत असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

विशेष म्हणजे गेल्या रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री होण्याबद्दल इच्छा व्यक्त केली होती. आपण जिथे जातो तिथले लोकं म्हणतात की, मी मुख्यमंत्री व्हावं, मी मुख्यमंत्री होईल का नाही माहित नाही पण मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी केल्यामुळे पंकजा मुंडेंना काय म्हणायाचं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2015 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close