S M L

औरंगाबादेत पुन्हा गाड्या जाळल्या, 8 गाड्या जळून खाक

Sachin Salve | Updated On: May 16, 2015 03:14 PM IST

औरंगाबादेत पुन्हा गाड्या जाळल्या, 8 गाड्या जळून खाक

16 मे : औरंगाबादमध्ये पुन्हा गाड्या जाळण्याचं सत्र सुरू झालंय. शहरातील जयभवानी नगर परिसरात रात्री अज्ञात लोकांनी आठ दुचाकी वाहनांना आग लावलीय. सकाळी जयभवानी नगरातील नागरीकांना गाड्या जाळल्याचा प्रकार लक्षात आला.

वाळूज एमआयडीसी आणि औरंगाबाद शहरात गेल्या वर्षभरात जवळपास 200 दुचाकी आणि 25 चारचाकी गाड्या जाळण्यात आल्यात. मात्र, पोलिसांना अद्याप आरोपींना पकडण्यात अपयश आलंय. विशेष म्हणजे, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळूनही आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळं नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2015 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close