S M L

भाजपसाठी 'झिजणार्‍या' पदाधिकार्‍यांना कोल्हापुरी चप्पल भेट

Sachin Salve | Updated On: May 16, 2015 08:57 PM IST

भाजपसाठी 'झिजणार्‍या' पदाधिकार्‍यांना कोल्हापुरी चप्पल भेट

16 मे : भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन 23 आणि 24 मार्चला कोल्हापुरात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमंत्रणादरम्यान पदाधिकार्‍यांच्या चप्पलची साईज विचारल्यानं पदाधिकारी अवाक झाले. मात्र, कोल्हापुरात अधिवेशन असल्यानं येणार्‍या पदाधिकार्‍यांना कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी राज्यभरातून तब्बल 900 पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी आहे. दरम्यान, काँग्रेसने या चपला भेट देण्याच्या भाजपच्या कल्पनेवर खोचक टीका केलीये. शेतकर्‍यांच्या चपला सरकार दरबारी खेटे घालून झिजल्या तरी त्याला मदत मिळाली नाही. मात्र, भाजपला पदाधिकार्‍यांच्या चपलांची काळजी असल्याच नांदेड काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2015 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close