S M L

भारत मंगोलियाला करणार 1 अब्ज डॉलर्सची मदत

Samruddha Bhambure | Updated On: May 17, 2015 01:57 PM IST

भारत मंगोलियाला करणार 1 अब्ज डॉलर्सची मदत

17 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मंगोलियाच्या दौर्‍यावर असून, त्यांनी भारताकडून मंगोलियातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे.

तीन दिवस चीनचा दौरा करून मोदी आज मंगोलियात दाखल झाले. यावेळी मंगोलियाचे पंतप्रधानांशी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला 1 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसंच, सुरक्षा, सायबर सुरक्षा, उर्जा अशा विविध मुद्यांवरील 14 करारांवर दोन्ही देशांनी रविवारी स्वाक्षरी केली आहे. भारत-मंगोलियाचे संबध अधिक दृढ करण्यासाठी भारत सदैव प्रयत्नशील राहील, असं मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी काल मंगोलियामधल्या प्राचीन बौद्ध मंदिरांनाही भेट दिली. मंगोलियाच्या दौर्‍यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

 मंगोलियाची निवड का ?

- भौगोलिकदृष्ट्या मंगोलियाचं स्थान महत्त्वाचं

- मंगोलिया हा देश चीन आणि रशिया या दोन महासत्तांच्यामध्ये

- चीनवर दबाव वाढवण्यासाठी चीनच्या शेजारी राष्ट्रांशी सक्रिय संबंध ठेवण्याची नीती

- मंगोलिया आणि भारत यांच्यातल्या व्यापारवाढीची मोठी संधी

- मंगोलियामध्ये कोळसा, सोनं आणि युरेनियमचा मोठा साठा

- भारताला भविष्यात अणुऊर्जेसाठी युरेनियमची मोठी गरज

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2015 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close