S M L

मुंबईमध्ये हिट अँड रनची आणखी एक बळी!

Samruddha Bhambure | Updated On: May 17, 2015 06:49 PM IST

मुंबईमध्ये हिट अँड रनची आणखी एक बळी!

 

17 मे : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या गाडीने 22 वर्षीय तरुणीला धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील गोरेगावमध्ये घडली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आणि रस्त्यावरुन जाणार्‍या अन्य वाहनचालकांनाही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या त्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे उपचार मिळण्यास विलंब झाल्याने त्या तरुणीचा दुदैर्वी अंत झाला.

टीसीएस कंपनीमध्ये काम करणार्‍या अर्चना पांड्याला बुधवारी रात्री 8 च्या सुमारास एका गाडीने उडवलं. धडकेत गंभीर जखमी झालेल्या अर्चनाला त्याच अवस्थेत सोडून ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पसार झाला. अर्चना बराच वेळ जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होती पण येणार्‍या- जाणार्‍यांपैकी कोणीही तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे अपघातस्थळापासून वनराई पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अपघाताची बातमी पोलिसांपर्यंतही पोहचू शकली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जर वेळेतच तिला मदत मिळाली असती तर आज कदाचित तिचा जीव वाचला असता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2015 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close