S M L

नाशिकमधल्या अपघातात 5 डॉक्टरांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2015 02:23 PM IST

नाशिकमधल्या अपघातात 5 डॉक्टरांचा मृत्यू

18 मे : नाशिकमधील महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या 5 डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली. या अपघातात आणखी एक डॉक्टर जखमी झाले आहेत.

मुंबई आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणार्‍या टेम्पोने एसयूव्ही गाडीला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की त्यात गाडीतील पाचही डॉक्टरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे, डॉ. कुंदन जाधव व डॉ. शेळके असं या मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत. तर डॉ. उमेश भोसले हे या अपघातात जखमी झाले आहेत. पाचही डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूने नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2015 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close