S M L

दबावाचं राजकारण करणार्‍या व्यापार्‍यांसमोर झुकणार नाही- सुभाष देसाई

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2015 07:40 PM IST

 

subhash18 मे : मुंबईतील मेटल उद्योजक गुजरातमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, दबावाचं राजकारण करणार्‍या व्यापार्‍यांसमोर झुकणार नाही अशी कडक भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतली आहे.

गुजरातमध्ये आम्हाला चांगल्या सोयी-सुविधा सवलतीच्या दरात मिळत असल्याचं सांगत मुंबईतील मेटल व्यापार्‍यांनी गुजरातला जायचा निर्णय घेतला आहे. पण आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. हे व्यापारी महाराष्ट्र सरकारविरोधात दबावाचं राजकारण खेळत असल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केला आहे.

विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सुट मिळावी, विक्रीकराच्या थकबाकीवरील व्याज आणि दंड माफ करावा अशी व्यापार्‍यांच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गुजरातला स्थलांतर करण्याची धमकी व्यापार्‍यांनी दिली आहे. व्यापार्‍यांच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही सोडवू. मात्र चुकीच्या कामासाठी व्यापार्‍यांपुढे झुकणार नाही, अशी भूमिका उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतली आहे.

दरम्यान, कोणत्याही व्यापारी, उद्योगाने मुंबई सोडू नये, अशी शासनाची भूमिका आहे. या व्यापार्‍यांच्याही आपण अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2015 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close