S M L

अजित पवारांना 'एसीबी'कडून दुसर्‍यांदा समन्स

Sachin Salve | Updated On: May 19, 2015 02:31 PM IST

ajit pawar and sunil tatkare19 मे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी ऍन्टी करप्शन ब्युरोने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आता दुसर्‍यांदा समन्स बजावणार आहे. त्याच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही समन्स बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढच्या आठवड्यात अजित पवार प्रत्यक्ष चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अजित पवारांना प्रत्यक्ष ऍन्टी करप्शन ब्युरोसमोर चौकशीसाठी हजर व्हावं लागणार होतं. पण, पवार राज्याबाहेर असल्यानं हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आता पुन्हा समन्स बजावले जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2015 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close