S M L

कोल्हापुरात पुन्हा टोल आंदोलन चिघळण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: May 19, 2015 03:03 PM IST

toll kolhapur19 मे : कोल्हापूरचा टोल प्रश्न आता पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. येत्या 1 जूनपासून टोलमुक्ती होईल असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. मात्र, पाटील यांनी आता घुमजाव केलंय. आज संध्याकाळी कृती समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुन्हा एकदा समिती तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता आहे.

केवळ MH 09 म्हणजेच कोल्हापूर पासिंगच्या वाहनांना 1 तारखेपासून टोलमुक्ती दिली जाईल. पुढच्या 8 महिन्यांमध्ये संपूर्ण टोलमुक्ती करू असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी टोलविरोधी कृती समिती समोर ठेवला. मात्र, हा प्रस्ताव कृती समितीने अमान्य केलाय. याबाबत आज संध्याकाळी कृती समितीची महत्वपूर्ण बैठक होतेय. या बैठकीला जिल्ह्यातल्या विविध संघटना आणि राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतर पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समिती देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या शुक्रवारपासून भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात सुरू होतंय. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या रोषाला या दिग्गजांना सामोरं जावं लागणार असंच दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2015 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close