S M L

कोल्हापूर : कचरा करणार्‍या 387 हॉस्पिटल्सला कारवाईचा डोस

Sachin Salve | Updated On: May 19, 2015 06:27 PM IST

कोल्हापूर : कचरा करणार्‍या 387 हॉस्पिटल्सला कारवाईचा डोस

19 मे : कोल्हापूर शहरातील नाल्यांमध्ये वैद्यकीय कचरा टाकल्याप्रकरणी शहरातल्या 387 हॉस्पिटल्सवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रदूषण महामंडळाने दिले आहे.

3 दिवसांपूर्वी शहरातून जाणार्‍या जयंती नाल्यामध्ये हा वैद्यकीय कचरा आढळून आला होता. जवळपास 200 किलोपेक्षाही जास्त हा कचरा होता. त्यामध्ये इंजक्शनच्या सुया, सलाईनच्या बाटल्या, कापूस आढळून आला होता.

या नाल्याचं पाणाी हे पंचगंगा नदीमध्ये मिसळतो. त्यामुळं या कचर्‍याची थेट पंचगंगा नदीमध्येच विल्हेवाट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं केला. या संस्थेनं याबाबत प्रदुषण महामंडळाकडे तक्रार केलीय.

त्यानंतर प्रदूषण मंडळानं कचरा टाकणार्‍या 387 हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याचा आदेश कोल्हापूर महापालिकेला दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2015 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close