S M L

राज्यभरात उन्हाचा पारा वाढला, वर्ध्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2015 09:58 PM IST

temperature

19 मे : मे महिन्याच्या मध्यंतरात विदर्भ आणि मराठवाडा क डक उन्हाने होरपळून निघतोय. चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि नागपूरमध्ये पारा चांगलाच चढला होता. वर्ध्यामध्ये आज सर्वाधिक म्हणजे 47.05 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावतीत 46.9, तर नागपुरात 46.6 अंश तापमानाची नोंद झाली.

अवकाळी आणि गारपिटीने विदर्भात यंदा उन्हाच्या झळा कमी जाणवल्या होत्या. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भाच्या तापमानात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यंदाच्या मोसमात वर्ध्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्ध्याचा पारा आज 47.05 अंशावर पोहचला होता. त्याखालोखालतर अमरावतीत 46.9, नागपुरात 46.6 अंश तापमानाची नोंद झाली. सतत वाढणार्‍या तापमानामुळे लोकं घरातचं बसणं पसंत करत असून त्यामुळे रस्ते ओस पडले आहेत. या उन्हामुळे कुलर, पंखे, एसीसुद्धा कुचकामी ठरत आहे. रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून यात लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे. अपचन, उलट्या, हगवण या सारख्या आजारांचा लोकांना सामना करावा लागतोय.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नका, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. काही निमित्त घराबाहेर जावं लागलं तर, लोक डोक्याला आणि तोंडाला रुमाल बांधूनच बाहेर पडताना दिसताहेत. तर अंगात वाढलेला उष्म्याचा दाह कमी करण्यासाठी ज्यूस किंवा थंड पेये घेण्यासाठी लोकांचा कल वाढताना दिसतोय.

वर्धा : 47.5अंश सेल्सियस

अमरावती : 46.9 अंश सेल्सियस

नागपूर : 46.6 अंश सेल्सियस

बुलडाणा : 46 अंश सेल्सियस

अकोला : 45 अंश सेल्सियस

जळगाव : 45 अंश सेल्सियस

भुसावळ : 45 अंश सेल्सियस

अंमळनेर : 45 अंश सेल्सियस

वाशिम : 44 अंश सेल्सियस

भंडारा : 44 अंश सेल्सियस

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2015 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close