S M L

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' मालिकेतील बा काळाच्या पडद्याआड

Sachin Salve | Updated On: May 20, 2015 01:39 PM IST

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' मालिकेतील बा काळाच्या पडद्याआड

20 मे : ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचं आज (बुधवारी) मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. 2013 साली त्यांना स्ट्रोक आला होता. त्यातून त्या बर्‍या झाल्या होत्या. स्टार प्लस वाहिनीवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी' या मालिकेतली त्यांची बा ही भूमिका खूप गाजली होती.

14 जुलै 1937 साली सुधांचा राजस्थानमधल्या एका गावात जन्म झाला. त्यांनी दिल्लीत अभिनयाची सुरुवात केली. 1974 साली त्या मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी नाटकांमध्ये काम केलं. आधे अधुरे, तुगलक, आणि खामोश, अदालत जारी है, अशा नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. रजनी या मालिकेत त्यांनी प्रिया तेंडुलकर यांच्या आईची भूमिका केली होती. सुधा शिवपुरी यांची मुलगी हिमानी शिवपुरी याही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2015 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close