S M L

मुख्यमंत्र्यांना स्वकियांकडूनच खिंडीत पकडण्याचे प्रयत्न -चव्हाण

Sachin Salve | Updated On: May 21, 2015 09:08 AM IST

chavan--621x41421 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वकियांकडूनच खिंडीत पकडण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. भाजपमधील अंतर्गत कलहामुळेच विकासकामांना खीळ बसत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

मंत्र्यांमधील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होत असल्यामुळे सरकारचं लोकांच्या कामांकडे लक्ष नाही असं जे चित्र आहे ते समाधानकारक अजिबात नाही असंही ते म्हणालेत. 'नागरिक' या सिनेमातील मुख्य कलाकार सचिन खेडेकर यांनी आयबीएन लोकमतचे पत्रकार बनून विचारलेल्या सडेतोड प्रश्नांना उत्तरं देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मत व्यक्त केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2015 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close