S M L

इक्बाल मिरचीने दाऊदचे 4 फ्लॅट्स 1 हजार कोटींना विकले होते ?

Sachin Salve | Updated On: May 21, 2015 09:28 AM IST

इक्बाल मिरचीने दाऊदचे 4 फ्लॅट्स 1 हजार कोटींना विकले होते ?

21 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शोधाशोध एकीकडे सुरू आहे. पण, आता त्याच्या संपत्तीबाबत खळबळजनक माहिती समोर आलीये. दाऊद गँगचा म्होरक्या इक्बाल मिरचीनं मुंबईत 1 हजार कोटींचा जमीन व्यवहार केला होता. मुंबईतली ही मालमत्ता विकून युरोपमध्ये गुंतवणूक केली होती.

दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या व्यवहाराची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी सुरू केलीय. त्यातही एक्सक्लुझीव्ह माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली.

दाऊदचा एकेकाळचा सहकारी इक्बाल मिर्ची हा त्याचा मुंबईतला कारभार बघत होता. इक्बालचा लंडनमध्ये 2013 मध्ये मृत्यू झाला. इक्बालनं मुंबईतले सी फेसिंग असेलेले चार फ्लॅट्स एक हजार कोटींना विकले आणि तो पैसा दाऊदनं युरोपात रिअल इस्टेटमध्ये गुंतवला अशी माहिती आहे. त्याच बरोबर ब्रिटन, तुर्की, स्पेन, सायप्रस, दुबई आणि मोरक्को इथंही दाऊदनं गुंतवणूक केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांना मिळलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2015 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close