S M L

लादेनला अमेरिकेवर आणखी 26/11 सारखे हल्ले करायचे होते !

Sachin Salve | Updated On: May 21, 2015 11:18 AM IST

osam bin laden21 मे : अमेरिकेवर 26/11 सारखा भीषण हल्ला घडवणार्‍या ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या सैन्यानं यमसदनी धाडलं. पण, मृत्यूपूर्वी लादेनला अमेरिकेवर आणखी हल्ले करायचे होते. एवढंच नाहीतर जगातील सर्व दहशदवादी संघटनांनी अमेरिकेच्या विरोधात लढावं असाही त्याचा मनसुबा होता.अमेरिकेने लादेनशी संबंधीत बरीच कागदपत्रं आता उघड केली आहेत. त्यातही माहिती मिळाली.

1 मे 2011 रोजी अमेरिकेच्या सैन्यानं पाकिस्तानाजवळील अबोटाबादमध्ये लादेनचा खात्मा केला. लादेनचा मृतदेह सुद्धा अमेरिकेच्या सैन्यानं कुणाचा हाती लागू दिला नाही अशी चोख कामगिरी बजावली. पण, आता पाच वर्षांनंतर अमेरिकेनं लादेनबाबतची कागदपत्र जगजाहीर केलीये. ही कागदपत्र ओसामाच्या अबोटाबादच्या घरातून अमेरिकन कमांडोंनी त्याच्यावर हल्ला करताना जप्त केली होती. लादेन अमेरिकेविरुद्ध आणखी हल्ले करायला उत्सुक होता असं या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतंय. जगातल्या सर्व दहशतवाद्यांनी अमेरिकेशी लढण्यावर लक्ष केंदि्रत करावं असं लादेनचं मत होतं. उत्तर आफ्रिकेतल्या दहशतवाद्यांनी इस्लामिक स्टेट न स्थापन करता अमेरिकेशी लढावं असं लादेनने एका पत्रात म्हटंलं होतं. तसंच येमेनमधल्या दहशतवाद्यांनीही अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करावं असं त्यांने सुचवलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2015 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close