S M L

मोहाली वनडेत भारताचा 24 रन्सने पराभव

3 नोव्हेंबर मोहाली वन डेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 24 रन्सनं पराभव केला. विजयासाठी 251 रन्सचं टार्गेट समोर ठेऊन खेळणार्‍या भारतीय टीम 226 रन्सवर ऑल आऊट झाली. हरभजन सिंग आणि प्रवीण कुमारनं आक्रमक फटकेबाजी करत भारताचा पराभव लांबला खरा. पण हरभजन 31 रन्सवर तर प्रवीण कुमार 16 रन्सवर आऊट झाल्यावर भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं. वीरेंद्र सेहवागनं नेहमीप्रमाणेच आक्रमक सुरुवात केली. पण नेहमीसारखाच तो झटपट आऊटही झाला. त्याने 30 रन्स केले. तर सचिन तेंडुलकर या मॅचमध्ये मोठा स्कोर करणार असं वाटत असतानाच तोही 40 रन्सवर आऊट झाला. भारताची मधली फळी तर सपशेल फ्लॉप गेली. ऑस्ट्रेलियातर्फे बॉलिंगरनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियाने प्रमुख बॅटसमनच्या शानदार खेळीच्या जोरावर 250 रन्स केले. कॅमेरुन व्हाईटने सर्वाधिक 62 रन्स केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने सात वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 2-2 अशी बरोबरी साधली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2009 10:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2009 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close