S M L

राज ठाकरेंना दिलासा, परप्रांतियांविरोधी सर्व खटल्यांना स्थगिती

Sachin Salve | Updated On: May 21, 2015 06:11 PM IST

raj_abad21 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिलाय. राज ठाकरेंनी परप्रांतियांविरोधी वक्तव्यांप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यांना दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली.

राज ठाकरे यांनी 2008 साली उत्तर भारतीयांविरोधात वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण, या खटल्यांमध्ये फारसं गंभीर काही नसल्याचं मत कोर्टानं नोंदवलं आणि या सर्व खटल्यांना स्थगिती दिली.

2008 साली राज ठाकरे यांनी परप्रांतियांविरोधात वक्तव्य केल्यामुळे मनसेसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलन करून परतप्रांतियांना मारहाण केली होती. कल्याणमध्ये रेल्वे भरतीसाठी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनाही पिटाळून लावण्यात आलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2015 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close