S M L

'लवकरच मराठी भाषेला अभिजात दर्जा'

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 01:52 PM IST

marathi_blog_banner22 मे : मराठी भाषेला आता लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी शक्यता आहे. कारण, अभिजात दर्जाबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवलाय. आणखीही एका भाषेचा असाच प्रस्ताव कोर्टात गेलाय. म्हणून मराठीच्या घोषणेला उशीर होतोय. पण लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय कॅबिनेटसमोर नेऊन तो आम्ही मंजूर करू अशी माहिती सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांची आयबीएन लोकमतला दिली आहे.

याअगोदरही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला होता. मराठी दिनाचं औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला पण, हा मुहूर्त टळला होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने हालचाल केली खरी पण या प्रकरणाची फाईल सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे असल्यामुळे दर्जा मिळू शकला नाही. अजून कायदा आणि गृहमंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाहीये. आता सांस्कृतिक मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवलाय. आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब होतं का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close