S M L

रोज 'मरे'.., मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 02:28 PM IST

रोज 'मरे'.., मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

thane_train22 मे : रोज मरे त्याला कोण रडे...आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. सकाळी ठाणे स्टेशनजवळ पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.दुरूस्तीचं काम दुपारपर्यंत सुरू असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

स्लो ट्रॅकची वाहतूक पूणपणे बंद होती. ठाणे स्टेशनवरील एक आणि दोन प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले होते. त्यामुळे फास्ट ट्रॅक वरून ट्रेन सुरू आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक कोलमंडल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तुटुंब गर्दी होती.

एकीकडे कडाक्याचं ऊन आणि दुसरीकडे रेल्वेचा घोळ झाल्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी बस, रिक्षा, टॅक्सीचा मार्ग निवडला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close