S M L

तब्बल 100 वर्षांनंतर सिंधुदुर्गात आढळले 2 दुर्मिळ निळे देवमासे

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 03:31 PM IST

तब्बल 100 वर्षांनंतर सिंधुदुर्गात आढळले 2 दुर्मिळ निळे देवमासे

22 मे : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी समुद्रात दोन भलेमोठे 'ब्लू व्हेल' म्हणजेच निळे देवमासे आढळून आले आहेत. तब्बल 100 वर्षांनंतर महाराष्ट्रात निळ्या देवमाशांचं दर्शन झालंय.

महाराष्ट्राचे वनसंवर्धन आणि पाणथळ विभागाचे मुख्य अधिकारी एन वासुदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 1914 साली महाराष्ट्राच्या समुद्रात अशाप्रकारचे 'ब्लू व्हेल' आढळून आले होते. त्यानंतर तब्बल गेल्या 100 वर्षांत ब्लू व्हेलचे दर्शन झाले नव्हते. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र संघविकास कार्यक्रमाच्या वतीने डॉल्फीन्सवरच्या अभ्यासासाठी नियोजित पथक महाराष्ट्राच्या समुद्रात शोध घेत असताना हे ब्लू व्हेल्स प्रजातीचे दोन मासे आढळून आले. 28 मार्चलासुद्धा या पथकाला कुणकेश्वरजवळ समुद्रात 2.7 किमी अंतरावर 'ब्लू व्हेल्स' आढळून आले होते. त्यानंतर 11, 16,30 एप्रिल आणि 6 मे या चार दिवशी आचरा, तारर्कर्ली, तळाशील आणि सराजकोट इथंही हे दोन 'ब्लू व्हेल्स' दिसून आले. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राच्या समुद्रात डॉल्फीन्सचे सर्वेक्षण करत असलेल्या पाच सदस्यीय पथकाने विजयदुर्ग ते रेडीपर्यंतच्या किनारपट्टीवर सर्वेक्षण केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close