S M L

राज्यात उष्णतेची लाट, गडचिरोलीत सिंरोंचाचा पारा 48.6 वर

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 05:02 PM IST

राज्यात उष्णतेची लाट, गडचिरोलीत सिंरोंचाचा पारा 48.6 वर

22 मे : राज्यभरात उष्णतेची जणू लाटच आलीये. विदर्भ,मराठवाडा, खान्देशमध्ये उन्हाचा चांगलाच पारा वाढलाय. विशेषत: विदर्भात उन्हानं लोक हैराण झाले आहे. गडचिरोलीतल्या सिरोंचात 48.6 सेल्सिअस इतक्या सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झालीये. तर वर्ध्यामध्ये सलग तिसर्‍या दिवशी पारा 47 अंशांवर होता. उत्तर महाराष्ट्रातही जळगाव आणि भुसावळमध्ये पारा 46 अंशांवर होता. जिल्ह्याचा पारा दुसर्‍या दिवशीही 47.5 अंशाच्यावर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. रस्ते ओस पडले असून जीवाची काहिली कधी थांबेल या प्रतीक्षेत आहेत.

वर्धा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा उतरलेला नाही. तापमान 47.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोचलंय. त्यामुळे वर्धावासीयांचे उन्हाळ्यानं हाल झालेत.

औरंगाबादेतही उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. नांदेड, परभणी च्या पाठोपाठ आता औरंगाबादेतही उन्हाचा पारा 45 पर्यंत पोहचलाय.

जळगावमध्येही तापमान 46 अंशावर येऊन पोहोचलंय. गेल्या 15 दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालीये. तर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यूदेखील झालाय. थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे जळगाव जिल्ह्यातील "पाल" सुद्धा चांगलंच तापल्ंाय.

या ठिकाणी 46 अंश तापमानाची नोंद करण्यात आलीये.आणखी पाच दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिलेत. उष्णतेचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत असून फक्त महत्वाचे कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताहेत. थंड पेय विक्रीत प्रचंड वाढ झालीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close