S M L

गोरेगाव फिल्मसिटीत बिग बींपासून 20 फुटांवर गोळीबार

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 05:35 PM IST

गोरेगाव फिल्मसिटीत बिग बींपासून 20 फुटांवर गोळीबार

film city firing 22 मे : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये गोळीबाराची घटना घडलीये. शिवसेना चित्रपट सेना सरचिटणीस आणि स्थानिक केबल ऑपेरेटर श्रीकांत उर्फ राजू शिंदे (45) यांच्यावर आज दुपारी गोरगावच्या फिल्मसिटी येथे गोळीबार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यापासून अवघ्या 20 फुटांवर हा गोळीबार झाला.

बाईक वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून हा गोळीबार केला. दुपारी 2 च्या सुमारास फिल्मसिटीच्या गेट क्रमांक 2 च्या ऍड लॅब समोर ही घटना घडली.

हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या. त्यातील 2 गोळ्या शिंदे यांना लागल्या. त्यांना सुरूवातीला गोरेगावच्या लाइफ लाइन या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. आता त्यांना नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शिंदे हे आरे कॉलनीच्या साई बाबा मंदिराचे संस्थापक होते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग होता. आरे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या घटनेबद्दल ट्विट केलंय.

अमिताभ बच्चन म्हणतात,

"ओके!! फिल्मसिटीमध्ये गोळीबार झालाय. आम्ही उभे होते तिथून 20 फुटांवर गोळीबार झाला... एकाचा मृत्यू झाला. सगळीकडे पोलीस आहेत."

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close