S M L

कोकणाची स्मशानभूमी होईल,असा निर्णय पंतप्रधान घेणार नाही -कदम

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 08:13 PM IST

ramdas kadam_Abad22 मे : जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पावरून शिवसेनेनं एकीकडे आक्रमक भूमिका घेतलीये तर दुसरीकडे मवाळ धोरणही स्विकारलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजूत काढल्यानंतर आता सेना नेत्यांचा सूर बदललाय. कोकणाची स्मशानभूमी होईल, असा निर्णय पंतप्रधान घेतील, असं वाटत नाही, असं मत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम व्यक्त केलं.

जैतापूरप्रश्नी गाडगीळ समिती आणि इतर 17 तज्ज्ञांचे अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवून त्यांचं मन वळवू, असा विश्वासही रामदास कदम यांनी व्यक्त केलाय. कोकणाची स्मशानभूमी होईल, असा निर्णय पंतप्रधान घेतील, असं वाटत नाही, असंही रामदास कदम म्हणाले. जैतापूर अणू प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही. मात्र स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे आणि शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ज्या दिवशी स्थानिकांचं समाधान होईल त्यादिवशी आमचा विषय संपेल, असंसुद्धा रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, सेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. पण, पंतप्रधानांनी 'विकासाला विरोध करू नका, असा सल्ला दिला होता. त्यानंतर सेनेच्या नेत्यांचा सूर बदलला असल्याचं दिसून येतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close