S M L

नागपुरातही गाड्या जाळण्याची घटना, मारुती स्विफ्ट जळून खाक

Sachin Salve | Updated On: May 23, 2015 01:36 PM IST

नागपुरातही गाड्या जाळण्याची घटना, मारुती स्विफ्ट जळून खाक

NAG_CAR_BURN23 मे : नागपूरमध्येही अज्ञात लोकांकडून घरासमोर उभ्या असलेल्या कार पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. नागपुरच्या त्रिमुर्ती नगरातील अशोक गाडेकर यांच्या घरासमोर त्यांची मारुती स्विफ्ट कार गुरूवारी रात्री अडीचच्या सुमारास जाळण्यात आली. रात्री गस्तीवर असणार्‍या पोलिसांना ही कार जळताना दिसली. तेव्हा त्यांनी अग्निशमन विभागाला बोलावून कार विझवली. कारच्या शेजारीच पेट्रोलची रिकामी बॉटलही आढळली.. त्यावरून ही कार पेटवली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गाड्या जाळणे किंवा त्यांची मोडतोड करणे, या घटना राज्यभर पहायला मिळतायत. 16 मे रोजी औरंगाबादमध्ये एका रात्रीत आठ गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 24 तासांच्या आत आरोपींना पडकण्यात आलं. पण काहीही कारण नसताना, इतरांच्या गाड्यांची नासधूस करून कोणता आनंद मिळतो, हा मोठा प्रश्न आहे. नाशकात तर हे प्रकार गेले अनेक वर्षं सुरू आहे..दहशत पसरवण्यासाठी हे केलं जातं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2015 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close