S M L

युती तुटली म्हणून भाजपची ताकद कळाली -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: May 23, 2015 02:01 PM IST

Uddhav and fadnavis1123 मे : आम्हाला कधी वाटलंच नव्हतं युती तुटेल आणि आम्हाला स्वबळावर लढावं लागेल. पण युती तुटण्याचा निर्णय झाला नसता तर भाजपची ताकद कळाली नसती असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. कोल्हापुरात भाजपचं अधिवेशन सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापुरात सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेपासून ते निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या निर्णयापर्यंतच्या सगळ्या मुद्दय्‌ांवर मुख्यमंत्र्यांनी फटकेबाजी केलीय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आव्हानाची परिस्थिती होती . आम्हाला कधी वाटलंच नव्हतं युती तुटेल आणि आम्हाला स्वबळावर लढावं लागेल. परिस्थितीने ती वेळ आमच्यावर आणली. तीन दिवसांच्या कालावधीत 288 जागांची तयारी आम्हाला करावी लागली. आमचे छोटे छोटे मित्र घेऊन आम्ही तयारी केली. दुर्देवाने आम्हाला वेगळा लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण, खर्‍या अर्थाने हा निर्णय झाला नसता तर भाजप पक्षाची ताकद काय आहे हे कळलं नसतं असा टोला मुख्यमंत्र्यांनी सेनेला लगावला. तसंत हनुमानाला त्याची ताकद काय आहे, शक्ती काय आहे तो विसरला होता. पण, ज्यावेळी त्याच्या शक्तीची आठवण करून देण्यात आली तेव्हा त्याने लंका दहन केलं. अशीच आठवण आम्हाला अमित शहा यांनी करून दिली आणि विधानसभेत घवघवीत यश मिळवलं. 1990 नंतर पहिल्यांदाच कोणत्या तरी पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा मिळवणार भाजप हा एकमेव पक्ष ठरला असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2015 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close