S M L

शिक्षण हक्क कायद्यात मुंबईत पालिका 'नापास'

Sachin Salve | Updated On: May 23, 2015 03:48 PM IST

शिक्षण हक्क कायद्यात मुंबईत पालिका 'नापास'

bmc mumbai23 मे : शिक्षण हक्क कायदा लागू होऊन तब्बल पाच वर्ष झाली तरी महाराष्ट्र शासनाला या कायद्याची अंमलबजावणी करण्यात अपयश आलाय. यामध्ये मुंबई महानगर पालिकाही सपशेल नापास झालीये.

पालिकेनं यावर्षी मात्र आपल्या 1100 शाळांपैकी 152 शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू केलाय. पूर्वीच्या 362 आणि नव्या 152 अशा 514 शाळांमध्ये यावर्षीपासून आठवीचा वर्ग असेल, पण महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे या 152 वर्गांमधून 7900 विद्यार्थी आठवीचं शिक्षण घेणार आहे. त्यामुळे एकिकडे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ग उभारणारी महापालिका दुसरीकडे त्याच कायद्यातील एका वर्गात 30 विद्यार्थ्यांची अट मात्र पाळायला विसरलीय. सर्व अकराशे शाळांमध्ये अजून वर्ग उभारु न शकल्याची खंत ही त्यांना वाटत नाहीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2015 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close