S M L

'जैतापूर'च्या विरोधासाठी उद्धव ठाकरेंनी 500 कोटींची सुपारी घेतली -राणे

Sachin Salve | Updated On: May 23, 2015 08:44 PM IST

uddhav and rane23 मे : जैतापूर प्रकल्पावरुन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीये. आंदोलन करायची ताकद आता शिवसेनेत नाही. शिवसेनेचे नेते केवळ नामधारी आहेत अशी जळजळीत टीका राणेंनी केली. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही रांणेंनी चांगलंच टीकास्त्र सोडलं. जैतापूर प्रकल्पाविरोधात आंदोलनासाठी उद्धव ठाकरेंनी 500 कोटींची सुपारी घेतली. याबद्दल आपण विधानसभेतही बोललो होतो असा आरोपही राणेंनी केला. ते कणकवलीत बोलत होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2015 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close