S M L

पाकिस्तानमधील हल्ल्याला भारतच जबाबदार - पाकिस्तान

Samruddha Bhambure | Updated On: May 24, 2015 03:59 PM IST

पाकिस्तानमधील हल्ल्याला भारतच जबाबदार - पाकिस्तान

24 मे : मनोहर पर्रिकर यांच्या विधानाने पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देतो, ही आमची भीती खरी ठरली, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणार्‍या अतिरेक्यांना संपवण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असं विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. या विधानावरुन पाकिस्तानने भारतावर टीका केली आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा आणि परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी पर्रिकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. भारतातील सरकारचा मंत्री पहिल्यांदाच अशा भाषेचा वापर करत दहशतवादाने दहशतवाद संपवण्याचे उघडपणे समर्थन करतो. यावरुन पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात असल्याचं सिद्ध होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी गटांनी परच्कर यांच्या विधानाचा प्रखर विरोध दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे पर्रिकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे. 'यापुढे पाकिस्तानमधील प्रत्येक हल्ल्याचे खापर भारतावर फोडले जाईल' असे त्यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2015 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close