S M L

राज नहीं समाज बदलना है - नितीन गडकरी

Samruddha Bhambure | Updated On: May 25, 2015 02:45 PM IST

राज नहीं समाज बदलना है - नितीन गडकरी

24 मे : राज नही समाज बदलना है, असं आवाहन करत भाजपचे केंदि्रय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवारी) भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारीणी बैठकीचा समारोप केला आहे. या कार्यकारीणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी औपचारीकरित्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

प्रत्येकाला आमदार, खासदार होण्याची इच्छा असून मंत्रिपदासाठी भाजपची स्थापना झालेली नाही, असे खडेबोल गडकरी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री, मंत्रिपद मिळाले म्हणून आता फूलस्टॉप न लावता जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

गेल्या 65 वर्षांत जनतेला काय मिळालं, असा सवाल करत नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने देशाला गरिबी दिली, तरुण बेरोजगार आहेत असा आरोपही त्यांनी केला.

पहिले पंतप्रधान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात साम्यवादी-समाजवादी विचारसरणी राबवली. या विचारसरणीने आपल्याला काय दिले, असा सवाल गडकरींनी विचारला. साम्यवादी रशिया आणि चीनही आता बदलला आहे. समाजवादी विचारसरणीच्या राष्ट्रांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे आपल्याला कोणता विचार हवा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही गडकरी म्हणाले. दिनदयाल उपाध्याय यांच्या राष्ट्रवाद, सुशासन आणि अंत्योदय या त्रिसूत्रीवर आपण चाललं पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2015 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close