S M L

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बसला अपघातात 11 ठार

Sachin Salve | Updated On: May 25, 2015 09:42 AM IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बसला अपघातात 11 ठार

25 मे : : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी आणि मिनी लक्झरी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. आच्छाडजवळ हा भीषण अपघातात घडला असून 11 जण ठार झालेत. आच्छाडजवळ सीमा हॉटेलजवळ हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तलासरी, वापी आणि सेल्वासामधील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. गुजरातहून मुंबईकडे जाणारी ही बस मुंबईहून गुजरातकडे जात होती. ही बस समोरून येणार्‍या मिनीबसवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मिनी बसचा यात चक्काचूर झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2015 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close