S M L

अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी सुनील नेसरीकरांना अखेरचा निरोप

Sachin Salve | Updated On: May 25, 2015 12:13 PM IST

अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी सुनील नेसरीकरांना अखेरचा निरोप

25 मे : काळबादेवी आगीत अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना भायखळा अग्निशमन केंद्रामध्ये मानवंदना देण्यात आली. यावेळी नेसरीकर कुटुंबियांसोबतच मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, माजी पालिका आयुक्त सीताराम कुंटेही उपस्थित होते.

रविवारी सुनील नेसरीकर यांचं ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये निधन झालं. काळाबादेवीतल्या आगीमध्ये नेसरीकर 50 टक्के भाजले होते. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पण त्यांचा एक एक अवयव निकामी होत गेला. काल हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यांचं निधन झालं.

नेसरीकरांच्या पार्थिवावर आता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काळबादेवी आगीत या अगोदर तीन अधिकारी शहीद झाले. आज अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या या लढवय्या अधिकार्‍यांना अखेराचा निरोप दिला.

कोण होते सुनील नेसरीकर?

2014 पासून प्रभारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी

आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेले अधिकारी

लोटस पार्क आगीत महत्त्वाची भूमिका

26/11 च्या हल्ल्यात धाडसी कामगिरी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2015 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close