S M L

मुख्यमंत्र्यांचं विधान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी चांगले -देसाई

Sachin Salve | Updated On: May 25, 2015 03:47 PM IST

मुख्यमंत्र्यांचं विधान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी चांगले -देसाई

25 मे : विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढलो नसतो तर ताकद कळली नसती या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी विधानं करावी लागत असतात असा टोला अनिल देसाई यांनी लगावला.

देसाई पुढे म्हणतात, भाजप स्वबळावर लढल्याने ताकद वाढली या विधानात काही गैर नाही. मात्र, एकत्र लढणार हे नंतर केलेले विधान जास्त महत्वाचे आहे असा शेराही देसाई दिला. आम्ही सोबत असलो तरी 63 जागा शिवसेनेने निवडून आणल्या. त्यामुळे शक्ति समोर प्रतिशक्ति असणं गरजेचं नाही असा सल्लाही देसाईंनी दिला. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढवणार हे मुख्यमंत्र्यांचं विधानाचं स्वागत करायलाही अनिल देसाई विसरले नाहीत. तसंच उद्धव ठाकरे स्वत: पुन्हा एकदा आपली भुमिका स्पष्ट करतील. जर स्थानिक लोकांचं हित नसेल तर अशा विकासाचा का फायदा?, जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा पुनरुच्चारही अनिल देसाईंनी केला. वसई विरार महापालिकेतील युतीबद्दल आज किंवा उद्या निर्णय होईल अशी माहितीही अनिल देसाईंनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2015 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close