S M L

अरूण गवळी जेलबाहेरच, पॅरोलमध्ये 29 मेपर्यंत वाढ

Sachin Salve | Updated On: May 26, 2015 02:29 PM IST

arun gavli26 मे : मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर बाहेर आलेला गँगस्टर अरुण गवळी आणखी काही दिवस जेलबाहेरच असणार आहे. आज (मंगळवारी) गवळी जेलमध्ये दाखल होणार होता. पण, गवळीच्या पॅरोलमध्ये हायकोर्टाकडून वाढ मिळालीये. त्यामुळे गवळी 29 मेपर्यंत पॅरोलवर जेलबाहेरच असणार आहे.

अरूण गवळी मुलाचं लग्नासाठी 5 मे रोजी 15 दिवसांचा पॅरोलवर जेलबाहेर आला होता. मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मिळावा यासाठी त्याने सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठात अर्ज केला होता. अखेर खंडपीठाने गवळीचा पॅरोल मंजूर केला होता. मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर आज गवळीची पॅरोल सुट्टी संपली होती. दुपारी गवळीला जेलमध्ये दाखल व्हायचं होतं. पण, आपल्या आईच्या आजारपणामुळे अधिक पॅरोल मंजूर करावा असा अर्ज हायकोर्टात दाखल केला. कोर्टाने गवळीचा अर्ज स्विकारत 29 मेपर्यंत अतिरिक्त पॅरोलला मंजुरी दिलीये.

गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसंच दादर येथील एका व्यापार्‍याकडे खंडणी मागितल्या प्रकरणात गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचे खटले मुंबई सेशन कोर्टातील विशेष मोक्का कोर्टात चालले. यावेळी कोर्टाने गवळीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गवळी ही शिक्षा नागपूर जेलमध्ये भोगत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2015 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close